बुलढाणालोणारविदर्भ

विजेचा लपंडाव बंद करा, नसता परिणाम भोगा..डॉ. गोपाल बछिरे..

विजेचा लपंडाव बंद करून प्रवाह सुरळीत करा नसता कार्यालयास ताळे ठोकू..याचे परिणाम आपणास भोगावे लागतील, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डॉ. गोपाल बछिरे, गजानन जाधव सर यांनी लोणार महावितरण कंपनीच्या अभियंत्यास निवेदन द्वारे दिला आहे. 

                            

लोणार शहर व ग्रामीण भागामध्ये एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे पंखे, कुलर, टीव्ही, मिक्सर, विजेचे दिवे, तसेच विजेचे उपकरण जळून खाक होत आहेत. यास जबाबदार कोण? एक तर संपूर्ण महिन्याचा वीज आकार, वीज भार, इतर सर्व शुल्क ग्राहकांवर लादता, त्याचबरोबर महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे वीज ग्राहकांचे अतोनात नुकसान होत आहे, याला सर्वस्व महावितरण कंपनी व त्या कंपनीने नियुक्त केलेले बेजबाबदार अभियंता जबाबदार आहेत, असे दिलेल्या निवेदनात नमूद केले असून विना विलंब त्वरित वीज प्रवाह सुरळीत करावा अन्यथा महावितरण कंपनीच्या पावर हाउस कार्यालयास ताळे ठोकण्यात येईल असा इशारा निवेदनाअंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीच्या अभियंताला देण्यात आला याप्रसंगी शिवसेनाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ॲड. दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, विभाग प्रमुख गोपाल मापारी, अल्पसंख्यांचे अशपाक खान, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर दूधमोगरे, तानाजी अंभोरे, दिव्यांग सेलचे सिद्धार्थ अंभोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर ज्ञानेश्वर जाधव वैभव जाधव तानाजी मापारी कैलास अंभोरे महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख संजीवनी वाघ, तालुकाप्रमुख तारामती जायभाये यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!