जळगांव जामोदबुलढाणा

सूनगांव येथील नागरिकांनी खुट मोर्चाच्या दिलेल्या, निवेदनाला महावितरणने दाखवली केराची टोपली..सात दिवस उलटूनही कोणतीच दखल नाही..

महावितरण च्या अधिकाऱ्यांनमध्ये एकही अधिकारी असा उरला नाही का जो, ह्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देईल.. अशी चर्चा सध्या सूनगावांत ऐकावयास मिळत आहे..

शेवटी सूनगांव वासीयांना खुट मोर्चा काढण्यास महावितरण भाग पाडत आहे हेच यावरून दिसून येत आहे.. सर्वसामान्य सूनगांव वासीयांची मागणी फक्त एव्हढीच की आम्हाला वीजपुरवठा अखंडित द्यावा, सारखा विद्युत पुरवठा खंडित होतो तो होऊ नये, ह्यात काय चुकीची मागणी आहे..वीजबिलाची वसुली करतांना वीज बिल भरायला उशीर झाला तर दंडही लावणार वेळप्रसंगी आमचे विद्युत कनेक्शन ही कट करणार, बिलामध्ये हा कर..तो कर..असे सतराशे साठ कर लावणार, अश्या प्रकारे सर्वच मनमानी महावितरण करणार..मात्र आपल्या ग्राहकांच्या समस्येकडे लक्ष देणार नाही..हे म्हणजे असे झाले “हम करे सो कायदा” सर्वच जर असे वागायला लागले तर मग सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागावा..अश्यामुळे तर प्रत्येक वेळेस ग्राहक मंच..किंवा न्यायालयाकडे दाद मागण्या शिवाय पर्यायच उरणार नाही..

बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद, तालुक्यातील सुनगाव येथील गावकऱ्यांनी एकत्रित येत दिनांक १९ मे रोजी तहसीलदार जळगाव जामोद व महावितरण अभियंता चौभारेवाला यांना गावाचा विज पुरवठा नेहमी खंडित होत असून विज पुरवठा सुरळीत करा याबाबत स्मरणपत्र देण्यात आले.महावितरण विभागाला मागील वर्षी १९ जून २०२४ ला गावकऱ्यांनी याच विजेच्या समस्येबाबत निवेदन दिले होते त्याला ११ महिने झाले त्या निवेदनावर दोन महिन्यापूर्वी गावापर्यंत महावितरणने पोल टाकून त्यावर तारही ओढले परंतु गावचा विद्युत पुरवठा अद्यापही चालू केलेला नाही.११ महिन्याचा कालावधी उलटूनही गावात विजेचा प्रश्न गंभीर असुन गावाचा विज पुरवठा खंडित झाल्यास सुरू होण्याची शास्वती नसते.गावाला सोळंके नामक लाईनमन असून तो गेल्या चार महिन्यापासून गावकऱ्यांना दिसलाच नाही.सध्या गावचा कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती आहे. मागील वर्षी महावितरण ने एका महिन्यात सुनगाव चा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्याचे पत्र दिले होते त्या पत्राला ११ महिने पूर्ण झाले तरीही गावचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. स्मरण पत्राची दखल घेऊन महावितरण ने ७ दिवसाच्या आत गावचा सुरळीत करावा अन्यथा खुट मोर्चा काढु असा इशाराच गावकऱ्यांनी दिला होता परंतु आज सात ते आठ दिवस उलटूनही महावितरणचा येथील विद्युत पुरवठा सुरळीत नाही नेहमी विद्युत दहा-पंधरा मिनिटानंतर बंद चालू होत आहे व कोणत्याच प्रकारच्या उपयोजना केलेल्या नाहीत व गावकऱ्यांना सुद्धा तसे लेखी स्वरूपात कळविले नाही या गावकऱ्याच्या निवेदनाला महावितरणने कोणतीच दखल न घेता केराचीच टोपली दाखविली आहे त्यामुळे सुनगाव येथील जनतेत रोष निर्माण झाला आहे त्यामुळे सुनगाव येथील जनतेचा खूट मोर्चा हा केव्हाही महावितरण कार्यालयावर धडकू शकतो

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!