जळगांव जामोदबुलढाणाराजकीय

भाजपाकडून जळगांव जामोद येथे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध..

आ.जितेंद्र आव्हाडांचे हे कृत्य निंदनीय व संतापजनक - सचिन देशमुख..

जळगांव जा, प्रतिनिधी :-
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशवासीयांसाठी दैवतासमान आहेत. ज्या महाड येथील चवदार तळ्याजवळ बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित- वंचितांच्या समान अधिकारांसाठी सत्याग्रह केला. त्याच चवदार तळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, जितेंद्र आव्हाड यांनी, वंदनीय बाबासाहेबांचे छायाचित्र फाडले. हे अतिशय निंदनीय व संतापजनक असे हे कृत्य असल्याचे मत भाजपा बुलढाणा, जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी व्यक्त केले.
या कृत्यातून जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सडक्या मानसिकतेचे आणि विकृतीचे प्रदर्शन केले आहे. मी जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध करतो..असे म्हणत भाजपा चे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध केला. वंदनीय बाबासाहेबांचा फोटो फाडणे हा केवळ बाबासाहेबांचा अपमान नसून हा त्यांना मानणाऱ्या करोडो देशवासियांचा व बाबासाहेबांनी निर्मिलेल्या ज्या संविधानाच्या पायावर भारतीय लोकशाही आहे त्या संविधानाचा देखील तो अपमान आहे.
आव्हाड हे मूर्ख आणि विवेकभ्रष्ट आहेत. त्यांचे नेते शरद पवार दिवसरात्र पुरोगामी भूमिकेचा जप करीत असतात. फुले – शाहू- आंबेडकरांच्या नावावर ते राजकारण करीत असतात. त्यांना सुद्धा नाठाळ आव्हाडांची ही विकृत कृती मान्य आहे का? या आव्हाडांची ते पक्षातून हकालपट्टी करणार आहेत की नाही? या प्रश्नाचे उत्तर शरद पवार यांना…या राज्यातील जनतेला द्यावेच लागेल, ह्या विकृत जितेंद्र आव्हाड यांनी, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला हा अपमान, भारतीय जनता पार्टी व या देशातील जनता कधीही विसरणार नाही. असेही यावेळी बोलताना सचिन देशमुख म्हणाले.

जळगांव जामोद सह..संपुर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टी कडून जितेंद्र आव्हाड ह्यांच्या फोटोला चपला, जोडे मारून तसेच त्यांचे फोटो फाडून निषेध आंदोलन करण्यात आले…यावेळी भाजपा प्रदेश सदस्य राजेंद्र गांधी, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, शहर अध्यक्ष कैलास पाटील,राजू भाऊ उमाळे, निलेश शर्मा, परिक्षीत ठाकरे, अजाबराव पाटील, अनंता गावंडे, महादेव धुर्डे, राधेश्याम जाधव, कैलास राजुस्कर, संजय पांडव, भगवान टापरे, पांडुरंग मिसाळ, अशोक नानगदे, आशिष सारसर, रामा इंगळे, शुभम चांडाले, उमेश येऊल, नितीन ढगे आदिंची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!