कृषीचिखलीबुलढाणाविदर्भ

पीक विमा न मिळाल्याने शेतकरी संतप्त; चिखली कृषी कार्यालयात केले ठिय्या आंदोलन..

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात, शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याच कारणामुळे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली येथील तालुका कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. तालुक्यातील काही गावांना पीक विम्याचे पैसे मिळाले असले, तरी देऊळगाव घुबे आणि इतर काही गावांचे शेतकरी अजूनही वंचित आहेत. यामुळे नाराज शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. काही शेतकऱ्यांनी असेही सांगितले की, त्यांच्या शेताचे पंचनामे झालेले असूनही त्याचा लाभ मिळालेला नाही. “आम्हाला हेक्टरी किती पैसे मिळणार? आणि मिळणार की नाही?” असे प्रश्न आंदोलक शेतकऱ्यांनी विचारले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!