जळगांव जामोदबुलढाणा

सुनगांवच्या डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांची पोस्ट-डॉक्टरल फेलो पदी निवड..

बुलढाणा जिल्ह्यातील, जळगांव जामोद तालुक्यात सुनगांव येथील, प्रा. डॉ. कुलदीपसिंह दर्यावसिंह राजपूत यांची युरोपियन युनियनच्या प्रकल्पासाठी पोस्ट-डॉक्टरल फेलो पदावर आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि विकास संस्था (त्रिवेंद्रम) मार्फत निवड झाली आहे…हा प्रकल्प युरोपमधील विकसीत राष्ट्रांमध्ये भारतातून होणाऱ्या कौशल्यपूर्ण कामगारांच्या स्थलांतर आणि शिक्षण यासंबंधीत आहे.                                                                                                             आपले मनोगत मांडताना डॉ. कुलदीपसिंह म्हणाले की, “भारतातून मोठ्या प्रमाणात परदेशात कामगारांचे स्थलांतर होत असते, अशावेळी परदेशात या कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणे आवश्यक आहे. तसेच भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्य शिक्षणास विशेष महत्त्व दिले असून त्यातून भारतीय युवकांना परदेशात अधिक संधी मिळतील तसेच भारत येत्या काळात मोठ्या संख्येने परदेशी विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करू शकेल. या सर्व पैलूंवर आम्ही संशोधन करून प्रकाश टाकणार आहोत. आमच्या अभ्यासातील अनेक बाबी केंद्र आणि राज्य सरकारला धोरण ठरविताना अतिशय उपयुक्त ठरतील”.                                                                                                     डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांच्या यशासाठी सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. डॉ. राजपूत यांचे इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू, हिंदुस्थान टाइम्स, सकाळ या वर्तमानपत्रांमध्ये तसेच आतंरराष्ट्रीय जर्नल्समध्ये सातत्याने लेख प्रकाशित होत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!