
आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशामध्ये झाला पाहिजे, हर घर आयुर्वेद पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून देशात देश का प्रकृती परिक्षण..अभियानाला उद्या संविधानदिनापासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे मोफत आरोग्य व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की देशातील पाच कोटी लोकांचे प्रकृती परीक्षण करणे हे या अभियानाचे उदिष्ट आहे. या अभियानासाठी एक मोबाईल अॅप देखील तयार करण्यात आले आहे. हे अभियान संपूर्ण देशामध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिनापासून सुरू होणार आहे तर अभियानाची सांगता 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त होणार आहे.



