
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद शहरातील, एका कोचिंग क्लासेस शिकवणी मध्ये असणाऱ्या विद्यार्थिनीवर, तेथीलच शिक्षकाने अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकावर..जळगांव जामोद पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार १७ वर्षीय विद्यार्थिनी ही जलाराम मंदिराजवळ असणाऱ्या एका कोचिंग क्लासेस मध्ये शिकवणी साठी जात होती. ही विद्यार्थिनी शिकवणीला गेली असता, कोचिंग क्लासेस चालक..शिक्षक, किशोर पाटील यानी दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता च्या सुमारास विद्यार्थिनीला तुला काही प्रॉब्लेम आहे का..असे म्हणून फिर्यादीच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवला अशी तक्रार फिर्यादीने जळगांव जामोद पोलिसात दिनांक २६ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगांव जामोद पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता ७४ सकलम ८ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जळगांव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहे.



