कृषीजळगांव जामोदबुलढाणा

ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम ७ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा – समाधान दामधर..

रक्कम ७ दिवसांत खात्यात जमा न झाल्यास शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशाऱ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

दि. २३ सप्टेंबर ला बुलढाणा जिल्ह्यातील, जळगांव जामोद तालुक्यात..गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पिक नुकसान ग्रस्त ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ची रक्कम खात्यात तत्काळ जमा करणे बाबत शेतकऱ्यांनी तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून, आमरण उपोषणाचा इशारा दिला.
सदर निवेदनात नमूद आहे की, जळगांव जामोद तालुक्यामध्ये रब्बी २०२४ मध्ये झालेल्या, वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रब्बी शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले होते, सदर पिक नुकसानीचे पंचनामे आपल्या कार्यालया द्वारे केलेले असुन सदर पिक नुकसानीची रक्कम प्राप्त करण्या करिता शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे, परंतु अजून पर्यंत सदर लाभार्थी शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
तरी जळगांव जामोद तालुक्यात..गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पिक नुकसान ग्रस्त ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ची रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

सदर रक्कम ७ दिवसांचे आत जमा न झाल्यास, आम्ही खाली सही करणार शेतकरी..आमरण उपोषणास बसणार असुन सदर देत असलेल्या निवादेनासच उपोषणाची नोटीस समजावी. तहसिल कार्यालयाच्या दिरंगाई मुळे एक ही शेतकरी मदती पासुन वंचित राहिल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व प्रशासन म्हणून याची पूर्ण जबाबदारी आपली राहिल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी समाधान दामधर, विकास धुळे, निखील काळपांडे, प्रेमसिंग पवार, रमेश मिसाळ, राहुल सुरेश धर्मे, रुख्मिणी मारोती सातपुते, महादेव मिसाळ, राजाराम धुळे, पुंडलीक धुळे, संजय धुळे, प्रकाश धुळे, यशोधा गजानन काळपांडे, सुनिलशिंग राजपूत, गजानन कपले, अनंता हागे, सुरेश धर्मे व अनेक शेतकरी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!