
नांदुरा :- महाराष्ट्राची जिवनवाहीनी एस.टी. हि १ जुन ला ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. एस.टी. चा महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. एस.टी. ने आपल्या कार्यकाळात अद्यापर्यंत खुप चढऊतार पाहले, मात्र कितीही संकट येवोत जनतेच्या सेवेसाठी ती अविरत धावत आहे. महाराष्ट्राच्या तळागाळाच्या प्रत्येक समाज घटकास अत्यंत आवडणारी एस.टी. आज ७६ वी गाठून ७७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्य बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा येथील बसस्थानकात एस.टी. चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन वाहतुक नियंत्रक गायकी यांनी केले.

कार्यक्रमास नांदुरा येथील सेवानिवृत्त प्राचार्य घोगले यांची प्रमुख ऊपस्थिती होती, तसेच नांदुरा येथील पत्रकार पुरुषोत्तम भातुरकर यांनी ऊपस्थिती दर्शवत एस. टी. बाबतची माहीती संकलीत केली. संत गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन कार्यक्रमास सुरवात झाली. तसेच लालपरिचे पुजन करुन ऊपस्थित प्रवाशांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रवाश्यांनी आनंद व्यक्त केला. सदर कार्यक्रमासाठी वाहतुक नियंत्रक माटे यांनी परिश्रम घेतले. यावेळी घोगले सर यांनी आपले मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास पत्रकार भातुरकर, सामाजिक कार्यकर्ते नाफडे तसेच चालक तायडे, सराग, सौ.अहिर, यासह अनेक चालक वाहक व प्रवाश्यांची ऊपस्थिती होती.



