क्राईमभंडाराविदर्भ

५ लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा सासरी नागपुरात छळ; विवाहितेच्या वडिलांची भंडारा पोलिसात तक्रार..

भंडाऱ्याच्या वैभविचा, नागपुरातील सासरच्या मंडळींकडून छळ

मुलीला सासरी सुखात ठेवायचे असेल तर, ५ लाखांचा हुंडा द्या. अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा. आमचे नक्षल्यांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू, अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला अंगावरील कपड्यांसह घरातून हाकलून लावत माहेरी परत पाठवल. हा धक्कादायक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला. भंडारा येथील प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या वैभवीचा विवाह १९ जानेवारीला नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार ले आऊट येथील राजेंद्र डेकाटे (५५) यांचा मुलगा अभिषेक उर्फ घुनेश्वर (२८) याच्या सोबत झाला. विवाहानंतर वैभवीचा पती अभिषेक, सासरे राजेंद्र, सासू माधुरी (४९) आणि नणंद नंदिनी (२३) यांनी हुंड्यासाठी तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू केला. माहेरून ५ लाख रुपये हुंडा आण, असा त्यांचा तगादा होता. वडिलांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दाखविताच सासरकडील मंडळींनी वैभविला २० मार्चला घरातून हाकलून लावतं माहेरी पाठविलं. त्यानंतर वैभविचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूर येथे सासरी गेले असता, त्यांना ५ लाख रुपये द्या अशी, धमकी दिली. याप्रकरणी नवविवाहितेचे मानस वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील मंडळी विरोधात भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पती अभिषेक, सासरे राजेंद्र, सासू माधुरी आणि नणंद नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!