आरोग्यजळगांव जामोदबुलढाणा

जळगांव जामोद येथे, सायकल ग्रुपच्या वतीने.. जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा..

जळगांव जामोद :- दिनांक 3 जुन हा दिवस सर्वत्र जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद येथे सायकल ग्रुप च्या वतीने शहरात सायकल रॅली काढून, सायकल चालवल्याने होणाऱ्या आरोग्य विषयक फायद्यांविषयी, जनजागृती करून हा दिवस साजरा करण्यात आला.
ह्यावेळी जळगांव जामोद सायकल ग्रुपच्या 50 सदस्यांनी शहरातील मध्यवर्ती भागातून जनजागृती करत सायकल रॅली काढली. आजच्या ह्या रॅली मध्ये विशेष करून जळगांव जामोद पोलीस स्टेशन चे ठाणेदार, आनंद महाजन तसेच जळगांव जामोद वनविभाग, रेंज फ़ॉरेस्ट ऑफिसर, नीलेश काळे.. सायकल सह सहभागी झाले होते. दैनंदिन जीवनात सध्या सायकल चा वापर कमी होतांना दिसतोय, मात्र नियमित सायकलिंग केल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते व रक्तदाब नॉर्मल राहतो. वजन वाढत नाही, व्यक्ती शारीरिक दृष्ट्या फिट राहातो, रोज किमान 25-30 मिनिटे सायकलिंग केल्याने हैप्पी हार्मोन्स सक्रिय होतात त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते. त्यामुळे सर्वांनी स्वतः साठी स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी दिवसातून किमान 25-30 मिनिटे तरी सायकलिंग करावे, असे आवाहन जळगांव जामोद सायकल ग्रुपच्या वतीने शहर वासियांना करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!