जळगांव जामोदबुलढाणा

अखिल भारतीय बारी समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन…

समाजावर अन्याय झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा - समाधान दामधर

दिनांक 20 जून 2024 रोजी उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद, कार्यालयासमोर जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील, बारी समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन संपन्न झाले. सदर आंदोलनामध्ये  बारी समाजाकडून मुख्यत्वे तीन मागण्या करण्यात आल्या आहेत.

1. संत श्री रूपलाल महाराज यांचे 15 एकर मध्ये भव्य स्मारक..

2. बारी समाजाकरता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे..

3. पान मळा, पान पिंपरी व मुसळी या पिकांचा औषधी वनस्पतींच्या यादीत समावेश करणे..

1 ऑक्टोबर 2023 रोजी शेगांव येथे पार पडलेल्या, अखिल भारतीय बारी समाजाच्या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्य शासनाच्या विविध आमदार प्रतिनिधींनी सदर मागण्या, लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या अधिवेशनाला नऊ महिन्याचा कालावधी उलटून देखील, सदर मागण्यासंदर्भात कुठलेही हालचाल न झाल्याने आजचे आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. असे मत अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष, इंजिनियर रमेशचंद्र घोलप यांनी व्यक्त केले.
बारी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास व बारी समाजावर अन्याय झाल्यास, बारी समाजाकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल व सरकारला आगामी निवडणुकांमध्ये 15.ते.20 बारी बहुल मतदार संघात बारी समाजाच्या रोषा ला सामोरे जावे लागेल, असे परखड मत युवा उद्योजक समाधान दामधर यांनी व्यक्त केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या, डॉक्टर स्वाती वाकेकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर, एम . आसिफ इक्बाल तथा राजेश्वर  देशमुख  यांनी उपस्थित राहून  बारी समाजाच्या मागण्यांना समर्थन दर्शविले.
यावेळी रमेशचंद्र घोलप, समाधान दामधर, संजय पवार, श्याम डाबरे, तुकाराम काळपांडे, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार, रमेश ताडे, प्रल्हाद दातार, बळीराम धुळे, संजय पाटील , महेंद्र बोडखे, गौरव डोबे, गोपाल कोथळकर, संजय लक्ष्मण ढगे,   प्रल्हाद राऊत, शंकर म्हस्के, उमेश हिस्सल, गोपाल फुसे,  समाधान पाटील, सत्यविजय सातव, गणेश धर्मे, विजय वंडाळे, पुंडलिक पाटील, रामेश्वर केदार, लक्ष्मण नानकदे, रामा ढगे, प्रवीण कळस्कर, राजू मिसाळ, पांडुरंग ढगे, गणेश म्हस्के, भास्कर वंडाळे अशपाक देशमुख, सुभाष केदार, विकास धुळे व बहुसंख्येने जळगांव व संग्रामपूर तालुक्यातील बारी समाजाचे नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!