
मनोज जरांगे हे ओबीसी मधून मराठा समाजासाठी आरक्षण मागत आहे, या विरोधात गेल्या सात दिवसापासून ओबीसींच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समिती जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनांत.. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये केलेल्या लाखो अवैध नोंदी तात्काळ रद्द कराव्या व त्याची पडताळणी करावी, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी, मराठ्यांचा सगे सोयरे बाबतचा निर्णय लागू करू नये, मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण लागू करू नये, इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत व ह्या मागण्या मान्य करून ओबीसींना न्याय द्यावा, अन्यथा ओबीसी समाजाकडून आंदोलन छेडण्यात येईल, व पुढे होणाऱ्या परिणामास संपूर्णपने शासन जबाबदार राहील..असा इशारा ही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाची एक प्रत ओबीसी विभागाचे माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांना देण्यात आली आहे.

निवेदन देते वेळी ओ. पी. तायडे, राजीव घुटे, विजय सातव, राजेश लहासे, श्याम इंगळे, विजय म्हसाळ, सुनील धनभर, अनिल भगत, प्रशांत भोपळे, जयदेव वानखडे, रमेश अकोटकर, दुर्गादास अकोटकर, अनिल इंगळे, प्रकाश तायडे, अरुण वानखडे, शहादेव गोमासे, शरद गोमासे, वसंता जाधव, मनोज वाघ, सुनील भगत, गणेश व्यवहारे, सोपान गोंड, दिलीप बाभुलकर..इत्यादींची उपस्थिती होती..



