वर्धासामाजिक

वर्ध्यात लव्ह जिहाद प्रकरण आले उघडकीस, खासदार अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत कठोर कारवाईची केली मागणी…

वर्ध्यातील पुलगाव येथे राहत असलेल्या एका फिर्यादी तरुणीला फेसबुक, इंस्टाग्राम वर हिंदू परिवेशात असलेले फोटो टाकून व हिंदू असल्याचे भासवून बडनेरा येथील एका मुस्लीम युवकाने फिर्यादी तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून वर्धेत येऊन तिच्याशी मंदिरात हिंदू रितीरिवाजाने लग्न केले व माझ्या बहिणीचे लग्न व्हायचे असल्याने घरी सांगता येत नाही, असे म्हणत त्याने तिला घरी न नेता फिर्यादी हिच्याच घरी राहणे व येणे जाणे सुरू ठेवले. त्याने आपले नाव संचित अग्रवाल असल्याचे सांगितले. सदर काळात तो पूर्ण हिंदूंची वेशभूषा धारण करून राहायचा गळ्यात रुद्राक्ष माळ,अंगात भगवे कपडे,हिंदू कार्यक्रमात सहभागी होणे,याकरिता कोणालाही त्याच्यावर शक झाला नाही. त्यांनतर सदर युवक दुसरे लग्न करीत असल्याचे माहीत पडले व तो मुस्लीम समाजाचा असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनतर तिने बडनेरा येथे जाऊन सदर युवकाची भेट घेतली असता व सर्व प्रकरणावर बोलणे केले असता सदर युवकाने तिला धमकावणे व मारण्याची धमकी देऊन धर्म परिवर्तन करण्यास सांगितले. परंतु युवतीने त्यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली. तिने याबाबत पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली असता पुलगाव पोलिसांनी सदर प्रकरण गांभीर्याने न घेता घरघुती वादाचे प्रकरण म्हणून तक्रार दाखल करून घेतली. परंतु सदर युवतीने वेळोवेळी घडत असलेल्या प्रकणाबाबत पुलगाव पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कडे हे प्रकरण गेल्या नंतर सदर माहिती खासदार, माजी मंत्री अनिल बोंडे यांना देण्यात आली.

खासदार अनिल बोंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती सांगत याबाबत, विविध कलमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व भाजपचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!