
गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या हव्या त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे शेती मधील रोवणी काम संथ गतीने सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यामध्ये जवळपास फक्त 56% पाऊस झाला आहे तर जुलै महिन्याच्या 16 तारखेपर्यंत फक्त 88% पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये रोवणी कामाला वेग आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त 14 ते 15 टक्केच रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विचार केला असता जुलै महिन्यामध्ये ११० टक्के पाऊस पडला होता आणि जवळपास 40 ते 45% रोवणी काम पूर्ण झालं होतं परंतु यंदा गोंदिया जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी न लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे काम कोलमडले असल्याचे दिसून येत आहे. पण सध्या तरी लावलेल्या पिकांना कोणताही धोका नसला तरी,मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यामध्ये कायम आहे. आणि पर्जन्यमान झाल्याच्या नंतरच गोंदिया जिल्ह्यामध्ये भात पीक सुरळीत येऊ शकते अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक मंगेश वावगणे यांनी दिली आहे.



