जळगांव जामोदबुलढाणाविदर्भ

दोन वर्ष अगोदर बनविलेला पूल पूर्वपरवानगी न घेता तोडला

अज्ञात ठेकेदाराने पोकलेन च्या साह्याने परवानगी न घेता का तोडला पूल ?

जळगांव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते दोन वर्षा आधी सुनगाव येथील गोरक्षनाथ मंदिराकडे जाण्याऱ्या लेंडी नदीवरील पूल हा ग्रामपंचायतीने अंदाजपत्रकानुसार बांधला नव्हता, त्यामुळे त्या फुलाची रुंदी ही कमी झाली होती. त्यावेळी सुनगाव येथील नागरिकांनी पुलाची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती व उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता, त्यानुसार उपोषणाला नागरिक बसले होते. 

त्या पुलाला दोन वर्ष पूर्ण न होताच कोणताही कालावधी किंवा काल मर्यादा लक्षात न घेता दिनांक 16 सप्टेंबर रोजी अज्ञात ठेकेदाराने हा पूल पोकलेनच्या साह्याने उखडून काढला याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला नाही, या पुलाबद्दल सुनगाव ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना विचारणा केली असता आम्हाला काहीच माहित नाही व याबाबतीत कोणताही ठराव घेतलेला नाही असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे. तरी या सूनगाव ग्रामपंचायत अंतर्गत कोणीतरी अज्ञात ठेकेदार ही कामे करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी याप्रकरणी सूनगाव सरपंच व ग्रामसेवक हे गप्प का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे सुनगाव ग्रामविकास अधिकारी जोशी यांनी गटविकास अधिकारी यांना 27/ 11/ 2025 रोजी पत्र दिले आहे की सदर पुल कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आला, त्याबाबत ग्रामपंचायतला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत व 28/ 11/ 2025 रोजी सूनगाव येथील नागरिक विजय शत्रुघ्न वंडाळे यांनी…

सदर पूल तोडण्याला परवानगी नाही व काम कोणत्या योजनेतून चालू आहे याची कुठलीच माहिती नाही व पूला चे काम करताना अंदाजपत्रक किंवा फलक हे पुलाच्या जागी लावलेले नाहीत तरी या कामाबद्दल चौकशी करावी अशी तक्रार सार्वजनिक विभाग जळगांव जामोद यांना केलेली आहे. त्याची प्रतिलिपी गटविकास अधिकारी यांना दिलेली आहे तरी या सदर प्रकरणाची गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित व्यक्ती यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कदली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!