
यवतमाळ जिल्ह्यात, घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निघृन हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रभाकर मारवाडी असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे, तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे आरोपी पत्नीचे नाव आहे, आणि सुरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे. या दोघांचे प्रेम संबंध जुळले होते दरम्यान त्यांच्या प्रेमसंबंधात मृत प्रभाकर हा अडचण ठरत होता, त्यामुळे जयश्री आणि सूरजने प्रभाकरचे तोंड दाबून त्याची हत्या केली व त्यानंतर गावाशेजारील एका फाट्यावर त्याचा मृतदेह फेकून दिला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि घाटंजी पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता, या दोघांनीच प्रभाकरची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे तसेच पुढील तपास घाटंजी पोलीस करत आहेत.



