घटनाजळगांव जामोदप्रशासकीयबुलढाणाविदर्भ

पिंपळगाव काळे येथे मतदान केंद्रावरील टिन पत्रे उडाली

बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील पिंपळगावकाळे येथे मतदान आटोपल्यावर, अचानक विजांचा कळकळाट होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली व पाहता पाहता मतदान केंद्र क्रमांक 145 व 146 वरील टिनपत्रे अचानक उडून गेले यावेळेस निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले, मात्र मतदान यंत्र कर्मचाऱ्यांनी सुरक्षित रित्या बाहेर काढुन सुरक्षित स्थळी हलविल्यामुळे मतदान यंत्रे सुरक्षित राहिली. छतावरून दगड पडल्यामुळे निवडणूक कर्मचारी डॉक्टर गजानन वानखेडे हे थोडे जखमी झाले, दैव बलवत्तर म्हणून सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी बालंबाल बचावले. सर्वांनी प्रसंगावधान राखत त्वरित सुरक्षित स्थळी धाव घेऊन आपआपले प्राण वाचवले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!