जळगांव जामोदबुलढाणा

सुनगांव येथील नागरिकांनी ग्रामपंचायत ला निवेदनाद्वारे दिला आंदोलनाचा इशारा..

रस्ता बांधकाम इतरत्र वळविल्याचा नागरिकांचा आरोप..

बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे दिनांक 19 सप्टेंबर रोजी वार्ड क्रमांक सहा मधील नागरिकांनी ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. सविस्तर असे की दिनांक 27 मार्च 2023 रोजी तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत पालखी रस्ता कामाची निवड केली होती, त्यामध्ये प्राधान्य प्रमाणे बऱ्हाणपूर रोड ते संजय सिंग राजपूत यांच्या घरापर्यंत, डॉ काळपांडे ते प्रभाकर कंटाळे, अनिल कोथळकर ते प्रल्हाद एडाखे, नागेश्वर महाराज मंदिर ते अवजीसिद्ध महाराज मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय ते बस स्टँड, अनंता अंबडकार ते राजेश झंवर दुकान, पुरुषोत्तम कठाळे ते देवकाबाई पले या अनुक्रमाने रस्ता बांधकाम करण्यास त्यास मंजुरी दिली आहे, तरी त्या ठरावा मधील रस्ता बांधकाम हे वार्ड क्रमांक चार मध्ये वळविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वार्ड चार मध्ये रस्ता आठ ते दहा दिवसापासून खोदलेला आहे, तरी आपण घेतलेल्या ठरावानुसार बऱ्हाणपूर रोड ते संजय सिंग राजपूत यांच्या घरापर्यंतचा रस्ता मागील उन्हाळ्यात झालेला आहे. तरी ठरावनुसार प्राधान्य क्रमाने निवड केलेल्या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी वार्ड क्रमांक 6 मधील, सुनगांव येथील नागरिक अमोल प्रल्हाद येडाखे व इतर नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनावर 40 ते 45 नागरिकांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!