
यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील रोहडा येथील लाईनमन, नामदेव पांडुरंग मारकड ह्याने विद्युत खांबावर लाईन दुरुस्तीचे काम असल्यामुळे, महावितरण च्या ऑपरेटर ला लाईन बंद करायला सांगितले होते, व तो खांबावर चढला, वर चढल्यावर त्याला शॉक लागून तो जागीच मरण पावला..ह्यानंतर नातेवाईक व गावकऱ्यांनी पुसद..वाशिम रस्त्यावर, रास्तारोको आंदोलन करीत संबधित महावितरण च्या कर्मचाऱ्यावर कारवाई करून मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली..



