जळगांव जामोदबुलढाणा

समाधान दामधर यांच्या नेतृत्वातील काँगेस च्या आंदोलनाला यश..

गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पिक नुकसान ग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध..समाधान दामधर यांनी सर्व प्रसिद्धी माध्यम व पत्रकारांचे मानले आभार..

बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यात जामोद व सुनगांव मंडळातील अवकाळी पाऊस व गारपीट, यामुळे नुकसान झालेल्या शेतकरयांना मिळणाऱ्या, नुकसाभरपाईची यादी तहसील कार्यालया मार्फत प्रसिध्द करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ओबीसी विभाग..जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर तसेच तालुका, शहर काँग्रेस कमिटी जळगांव जामोद यांच्या वतीने जळगांव जामोद तालुक्यात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पिक नुकसानीचा पंचनामा झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तात्काळ प्रदर्शित करून भरपाई ची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आंदोलन कऱण्यात आले होते.
जळगांव जामोद तालुक्यामध्ये २०२३-२४ मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाउस व गारपीट मुळे तालुक्यातील रब्बी शेत पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या वतीने केलेल्या पाठपुराव्या नंतर, सदर पिक नुकसानीचे पंचनामे केलेले होते. जळगांव जामोद तालुक्यातील विविध मंडळातील मुखत्वे जामोद व सुनगांव मंडळातील ७,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले होते.
सदर याद्या प्रदर्शित न झाल्यास व तहसिल कार्यालयाच्या दिरंगाई मुळे एक ही शेतकरी मदती पासुन वंचित राहिल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा परखड इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग चे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी दिला होता.                                                               महाराष्ट्र शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसान भरपाई बाबत घोषणा केलेली आहे. सदर पिक नुकसानीची रक्कम प्राप्त करण्या करिता शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालयाद्वारे प्रदर्शित केलेल्या यादी मधील क्रमांक भरणे आवश्यक असते.
परंतु जळगांव जामोद तहसिल कार्यालयाने अजून पर्यंत सदर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रदर्शित केलेली नव्हती, परिणामी तालुक्यातील शेतकरी शासनाने घोषित केलेल्या त्यांच्या हक्काच्या मदती पासुन वंचित राहन्याची शक्यता होती.
तरी तहसिल कार्यालाया मार्फत तात्काळ सदर शेतकऱ्यांची यादी प्रदर्शित करावी व शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई ची रक्कम जमा करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानास पूर्णपणे तहसिल कार्यालय व तहसीलदार म्हणून आपण जबाबदार असाल व एक ही शेतकरी मदती पासुन वंचित राहिल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व प्रशासन म्हणून याची पूर्ण जबाबदारी आपली राहिल असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आलेले होते.

सदर नुकसानभरपाई च्या याद्या मिळताच शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून समाधान दामधर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे.
यावेळी समाधान दामधर यांनी सर्व शेतकरी, काँगेस चे सहकारी व पत्रकार व प्रसिद्धी मध्यमांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!