
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम सुनगांव येथे, भैरवी जगदंबा शांती उत्सव मंडळाने एक आगळावेगळा पायंडा समाजासमोर आणला आहे. ग्रामीण भागात सद्यस्थितीत कोणत्याही मिरवणुकीमध्ये… प्रसिद्धी झोतात असलेल्या डीजेच्या तालावर नाचण्याची परंपरा पडली असुन, डिजे मुक्त विसर्जन मिरवणूक काढुन ही परंपरा सुनगावांतील भैरवी जगदंबा मंडळाने मोडीत काढली असुन, जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक लेझीम पथक व सांप्रदायिक टाळकरी मंडळे, भजनी मंडळे, यांचा तसेच गावकऱ्यांचा समावेश करत विविध भजने व देवीचे गुणगान करत मंगलमय वातावरणात मिरवणूक काढून, जिल्हाभरातील तरुणाईला एक सकारात्मक संदेश दिला आहे.

सध्या प्रत्येक ठिकाणी मिरवणूक असो वा लग्न समारंभ या ठिकाणी डीजे सांगितल्या जातो. परंतु डिजेमुळे अतोनात हानी होत असुन, डिजेवरील लेझर किरणांमुळे कित्येकांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. तर कर्नकर्कश आवाजाने कित्येकांना बहिरेपणा आला. परंतु सुनगांव येथील भैरवी जगदंबा उत्सव मंडळाचा हा स्तुत्य उपक्रमच म्हणावा लागेल की त्यांनी.. डीजे ला फाटा देऊन भजनी मंडळ ला पसंती दिली..भैरवी जगदंबा उत्सव मंडळाने यंदाच्या जगदंबा उत्सव मिरवणुकीत आगळवेगळा पायंडा रचला. महागडे बँड, डीजे वर खर्च न करता भैरवी जगदंबा उत्सव मंडळाने टाळकरी महिला, पुरुष यांना मिरवणूक सहभागी केले. विशेष म्हणजे महिलांनी टाळ मृदूंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात लेझीम चे सादरीकरन केले. भैरवी जगदंबा उत्सव मंडळाने काढलेल्या अनोख्या विसर्जन मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होत असुन, अश्याच प्रकारे विसर्जन मिरवणुकीतमध्ये पारंपरिक वाद्ये वाजवण्याची प्रथा प्रचलित व्हावी असे अनेकांचे मत आहे. भैरवी जगदंबा उत्सव मंडळाचे विशाल दामधर, स्वप्नील दामधर, रवि दामधर, दिनेश दामधर, अतुल दामधर, गोपाल दामधर, किरण दामधर, दीपक दामधर, निलेश दामधर, सागर दामधर, सुरेश दामधर, संदीप ढगे यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले…



