बुलढाणालोणारविदर्भ

लोणार तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने स्व.सुनील पाटील यांना श्रद्धांजली..

बुलढाणा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील पाटील यांचे ३ फेब्रुवारी २०२५ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. एका वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीला बळ देऊन सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या आकस्मित जाण्याने सर्व जिल्ह्याला धक्का बसला त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीने एक चांगला अधिकारी गमावला असल्याचे मत व्यक्त करत, उपस्थितांनी त्यांच्या जीवन चरित्र व त्यांनी केलेल्या कार्याबाबत आपापल्या भाषणातून आपापली मत व्यक्त केली. आज दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी स्व.सुनील पाटील यांना लोणार तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने प्रताप सार्वजनिक वाचनालय लोणार येथे ग्रंथालय संघाच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पं.ल.सानप, राजाराम वाचनालयाचे राऊत, येऊल वाचनालयाचे सुनील कायंदे, जिजाऊ वाचनालयाचे अनिल दहातोंडे, तथागत वाचनालयाचे वानखेडे, डॉ आंबेडकर वाचनालयाचे मोरे, महात्मा फुले वाचनालयाचे सागर पनाड, उर्दू वाचनालयाचे शे.नूर, तसेच तालुक्यातील सर्व ग्रंथालय कार्यकर्ता यावेळी उपस्थित होते. यावेळी सानप, राऊत यांनी आपल्या मनोगतात साहेबांच्या आठवणी व्यक्त केल्या. विवेक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सभेचे सूत्र संचालन मंगेश शेटे यांनी तर आभारप्रदर्शन कैलास इंगळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!