
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट चे काही रुग्ण मुंबई पुणे या ठिकाणी आढळले आहेत आणि त्यामुळे बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असल्याच पाहायला मिळत आहे. अद्याप पर्यंत जिल्ह्यात असा एकही रुग्ण नाही. मात्र त्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याच सांगत. RTPCR लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता संबंधित आजाराची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांनी केले आहे.



